Saturday, 2 January 2016

शिवशक्ती संगम - आग्रहाचे आमंत्रण..!!!!

🚩 शिवशक्ती वार्ता🚩

आग्रहाचे आमंत्रण.....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा "शिवशक्ती संगम" हा कार्यक्रम पहायला सहकुटुंब या...
रा. स्व. संघानी गेली ९ दशके केलेल्या कार्याची माहिती व महती जाणून घेण्यासाठी या...
प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून अनेक विद्वानांनी, राजकारण्यांनी, विरोधकांनी, देशद्रोह्यांनी, समाज कंटक प्रवृत्तींनी आपल्यापर्यंत पोहचवलेला संघ प्रत्यक्षात कसा आहे ते जाणून घेण्यासाठी या... व्यवस्थापन म्हणजे नक्की काय असतं हे अनुभवण्यासाठी या...
लाखभर स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात उपस्थित राहणार आहेत... हा स्वयंसेवकांचा मेळा पहायला या...
८० x २०० आकाराचे भव्य व्यासपीठ, व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेला रायगडावरील राजदरबार, कार्यक्रमास येण्यासाठी हिंदवी स्वराज्यातील १६ किल्ल्यांची १६ अतिभव्य प्रवेशद्वारे, संपूर्ण संघस्थानास तटबंदी....
बाहेरगावाहून येणा-या स्वयंसेवकांसाठी ४५ सिद्धता केंद्र, सर्व सोयींनी सुसज्ज असा ४५० एकरांचा संघस्थान व बाजूचा पूर्ण परिसर आणि या सर्वांमध्ये ७० फुट उंचीवर दिमाखदारपणे आणि डौलाने आसमानात फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज...
हा अतिभव्य, 'न भूतो न भविष्यति' असा सोहळा व त्या सोहळ्याचे 'याचि देहि याचि डोळा' साक्षीदार होण्यासाठी आपण सहकुटुंब या....
रविवार दि. ३ जानेवारी २०१६ रोजी दुपारी
३:३० वाजेपर्यंत मारूंजी, जांबे, नेरे गावसीमा (हिंजवडी जवळ, पुणे) येथे संघस्थानी या.....
आम्ही सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते उत्सुक आहोत आपल्या स्वागता साठी... !
#ShivShaktiSangam
सदैव आपलाच,

- स्वयंसेवक





Thursday, 31 December 2015

ShivShaktiSangam - !! नव्या युगाची दे ललकारी, शिवशक्तीचा अपूर्व संगम !!

#‎ShivShaktiSangam‬



!! नव्या युगाची दे ललकारी, शिवशक्तीचा अपूर्व संगम !!
" शिवशक्ती संगम ",
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,
पश्चिम महाराष्ट्र प्रांत सांघिक.
एक ऐतिहासिक कार्यक्रम ......
एका दृष्टीक्षेपात....
दिनांक :- ३ जाने २०१६ , रविवार
स्थान :- मारुंजी, नेरे आणि जांबे गांवसीमा, पुणे
१) महाराष्ट्रातील ७ शासकीय जिल्ह्यांमधील लाखभर गणवेषधारी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण
२) सर्व स्वयंसेवकांची एकाचवेळी नियोजित रचनेत बसण्याची व्यवस्था
३) प्रवास करून पोहोचणाऱ्या व सर्व स्वयंसेवकांना तयारी (सिद्धता) करण्याची, स्वच्छतेची व भोजनाची व्यवस्था
४) ४५० एकराचा विस्तीर्ण परिसर
५) १०० एकराचे प्रत्यक्ष संघस्थान
६) १५० एकरावर जिल्हाशः सिद्धता केंद्रांची व्यवस्था
७) २०० एकराचे जिल्हाशः वाहनतळ
८) ७० फूट (७ मजली) उंचीचा ध्वजस्तंभ
९) २,००० जणांचे घोषवादन प्रात्यक्षिक
१०) २०० फूट लांब, १०० फूट रुंद व ८० फूट उंचीचे व्यासपीठ
११) व्यासपीठावर पोहोचण्यासाठी उद्वाहनाची व्यवस्था
१२) पश्चिम महाराष्ट्राची ओळख असणार्‍या गडकोट किल्ल्यांचे सुशोभन
१३) विविध किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांची प्रतिकृती असणारी भव्य अशी १३ प्रवेशद्वारे
१४) ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांची बसण्याची व्यवस्था
१५) सहा हजारपेक्षा जास्त विशेष अतिथींची बसण्याची व्यवस्था
१६) ज्येष्ठ आणि विकलांग स्वयंसेवकांसाठी अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था
१७) सर्व महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय
१८) स्वयंसेवक व नागरीक यांना अडथळा येणार नाही अश्याप्रकारे छायाचित्रणाची व्यवस्था
१९) संघाच्या कामाची व्याप्ती विषद करणारी कागद आणि फ्लेक्स विरहीत डिजीटल प्रदर्शनी
२०) सर्व स्वयंसेवक व नागरीक यांना व्यासपीठावरील दृष्य दिसण्यासाठी डिजीटल पडद्यांची सोय
२१) संघ साहित्य व वस्तू विक्रीची व्यवस्था
२२) कार्यक्रमस्थानी १४ प्राथमिक उपचार केंद्रांची सोय.
२३) तातडीच्या मदतीसाठी २० रुग्णवाहिकांची व्यवस्था
२४) अद्ययावत सुरक्षा यंत्रणा
२५) Metal Detector, CCTV, Drone इ. सुरक्षा साधनांचा उपयोग
२६) आपत्ती व्यवस्थापनाची वेगळी व्यवस्था
२७) सर्व कार्यक्रमासाठी स्वतंत्र विमा संरक्षण व्यवस्था
२८) सर्व स्वयंसेवकांची संगणकीकृत उपस्थिती नोंदणी
२९) उपस्थिती नोंदणीशिवाय स्वयंसेवकांना संघस्थानी प्रवेश निषिद्ध
३०) पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरांना रहदारीस अडथळा न करता वाहतूकीची रचना
३१) प्रत्येक विभाग / जिल्ह्यासाठी स्वतंत्र रंगाची ओळख
३२) पुणे- पिंपरी चिंचवड महानगरांमध्ये शिरताना महानगर सीमाकेंद्रामध्ये स्वागत व मार्गदर्शन
३३) महानगर सीमाकेंद्र ते कार्यक्रमस्थान वाहनतळ या रस्त्यांवर विभागशः दिशादर्शक
३४) प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३५) नागरीकांसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३६) विशेष अतिथींसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३७) प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वाहनतळ
३८) नागरीकांसाठी स्वतंत्र वाहनतळ
३९) विशेष अतिथींसाठी स्वतंत्र वाहनतळ
४०) प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवकांना तयारीसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४१) अभ्यागतांसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४२) मातृशक्तीसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४३) येणार्‍या सर्व नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी भोजनाची सोय
४४) भोजनासाठी सुपारीच्या पानांपासून बनवलेले ताट, वाटी आणि पाण्यासाठी स्टीलचे पेले
४५) उरलेले खरकटे तिथेच खतात रूपांतरित करण्याची व्यवस्था
४६) स्वयंसेवक उपस्थिती नोंदणीसाठी अद्ययावत संगणकीकृत व्यवस्था
४७) ७० किमी लांबी होईल इतकी मैदानावरील आखणी
४८) साधारण ३.५ किमी लांब धावती कापडी कणात
४९) सर्व व्यवस्था उभ्या करण्यासाठी साधारण ७,५०० स्वयंसेवकांचा सहभाग
५०) प्रत्यक्ष शिवशक्ती संगम कार्यक्रमाची तयारी २.५ वर्षांपूर्वीपासून करणारे हजारो स्वयंसेवक
५१) विविध ठिकाणाहून आलेल्या स्वयंसेवकांना परतीच्या प्रवासासाठी शिदोरीची व्यवस्था
५२) प्रत्येक वाहन परत जाईपर्यंत महानगर सीमा केंद्र कार्यरत

#‎ShivshaktiSangam कार्यक्रमासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे तब्बल १५००० जलकुंभ (water jar) वापरले जाणार आहेत. कुठल्याही कार्यक्रमात एकाच वेळी इतके कुंभ वापरले गेलेले नाहीत. हा देखील एक विक्रम ठरू शकतो..



#‎ShivShaktiSangam‬
🚩जाणत्या राजाचे दूरगामी व्यवस्थापन !
छत्रपती शिवरायांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ निर्माण व्हावा. आज्ञापत्रातून त्यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेचा अभ्यास करता हा राजा काळाच्या किती पुढे होता याची महती पटते. शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यांवर केलेले काटेकोर जल व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत त्यांचा निकोप दृष्टिकोन तसेच पर्यावरणाविषयी त्याचे अत्यंत महत्त्वाचे विचार हे पाहता ख-या अर्थाने हा राजा पर्यावरणाचा प्रणेता होता.
ज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीने त्रस्त आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवरायांच्या विचारात, त्यांच्या धोरणात आपल्याला नवी दिशा मिळेल.

याच धर्तीवर #ShivShaktiSangam या विशाल कार्यक्रमाची व्यवस्थापकीय रचना पर्यावरण पूरकच केली आहे !
✅प्रत्यक्ष सहभागी होऊनच अनुभव घेऊ ना !!
🚩शिवशक्तीचा (असाही ) अपूर्व संगम !!!!


 #‎ShivshaktiSangam‬
वाजती तोफांचे चौघड़े,
नभी स्वराज्य तोरण चढ़े....
२०० फुट लांब आणि ५५ फुट उंचीचा तोरण गडाचा भव्य बॅकड्रॉप "शिवशक्ती" च्या व्यासपीठावर आज सायंकाळी चढ़ला आणि व्यासपीठाची शान गगनाला वळसणी घालू लागली....
Courtesy: Milind Verlekar





#ShivShaktiSangam हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण असले तरीही संपूर्ण कार्यक्रम पर्यावरण पूरक असेल या ची पूर्ण दक्षता घेतली गेली आहे


‪#‎ShivShaktiSangam‬ ३ जानेवारी २०१६ रोजी, पुणे येथे होणाऱ्या शिवशक्ती संगम ह्या कार्यक्रमाविषयी काही रोचक तथ्य जे ह्या कार्यक्रमाची भव्यता दर्शवितात. ‪#‎ShivShaktiSangam‬ च्या भव्य दिव्य कार्यक्रमात आपणही सहभागी व्हा!





राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - शिवशक्ती संगम, मारुंजी पुणे

#ShivShaktiSangam
🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ🚩
🚩शिवशक्ती संगम 🚩
🚩 मारुंजी पुणे .🚩
🚩 3 जानेवारी 2016 🚩
🚩 दुपारी 12-6 🚩
🙏🙏🚩🙏🙏
@@जगभरातील संपुर्ण मिडिया वर live प्रक्षेपण
🙏🙏🚩🙏🙏
@@ 450 एकर मध्ये भव्य दिव्य मैदान .
🙏🙏🚩🙏🙏
@@ 1 लाखा पेक्षा जास्त स्वयंसेवक पूर्ण गणवेशात
🙏🙏🚩🙏🙏
@@पोलिस संरक्षण नाही. जे काही असेल ते फक्त संघाचे स्वयंसेवक संरक्षण करतील.
🙏🙏🚩🙏🙏
@@250 फुटाचा म्हणजे 5 मजली एवढा भगवा ध्वज.
🙏🙏🚩🙏🙏
@@ 3 मजली उंच असे भव्य स्टेज
🙏🙏🚩🙏🙏
@@ 15 गुंठे एवढ्या लांबी चे स्टेज .
🙏🙏🚩🙏🙏
@@ 10 हजार पेक्षा जास्त VIP.आणि प्रमुख पाहुणे
🙏🙏🚩🙏🙏
@@ 3 हजार पेक्षा जास्त घोष वादक.
🙏🙏🚩🙏🙏
@@150एकर मध्ये पार्किंग , प्रत्येक २००० स्वयंसेवकांसाठी एक प्रमाणे ८० तंबू.
🙏🙏🚩🙏🙏
@@ ट्राफिक ला कोणताही अडथळा होणार नाही याची पूर्ण पणे काळजी.
🙏🙏🚩🙏🙏
@@पुण्यातिल प्रत्येक रोड वर अपघात झाला तर क्रेन ची सुविधा.
🙏🙏🚩🙏🙏
.@@ 2 हजार पेक्षा जास्त डॉक्टर.
🙏🙏🚩🙏🙏
@@ 60 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक .
🙏🙏🚩🙏🙏
@@ प्रत्येक जिल्ह्याला एक कलर बॅंड असेल तो कलर बॅंड रोड वर लावलेला असेल त्याच दिशेने बाहेरील स्वयंसेवकानी यायचे .
🙏🙏🚩🙏🙏
@@कार्यक्रमाच्या मैदानात येण्यासाठी 1 कि.मी चालत यायचे.
🙏🙏🚩🙏🙏
@@1 लाख स्वयंसेवक शिस्ति मध्ये कवायत करताना दिसतील
🙏🙏🚩🙏🙏
@@@आज पासुन फक्त 59 दिवस बाकी. युद्ध पातळी वर काम. मारुंजी गाव ऐतिहासिक होणार पुढिल 50 वर्ष .
🙏🙏🚩🙏🙏
@@ज्या गावात रोड नव्हता त्या गावात 15 कि.मी .चा रोड आणि तो पण डांबरी रोड .
गावाचा नकाशाच एक कार्यक्रम बदलुन टाकणार असा मोठा कार्यक्रम
🙏🙏🚩🙏🙏
@@ शिवाजी महाराजांवर ज्यानी सिरियल .सिनेमा तयार केले ते नितिन देसाई हे डेकोरेशन चे सगळे काम बघणार.
🙏🙏🚩🙏🙏
@@भारतातील टॉप च्या मॅनेजमेंट कंपनी यामध्ये सहभागी.
🙏🙏🚩🙏🙏
@@अमेरिका ,लंडन ,अाॅस्ट्रेलिया, जर्मनी.फ्रान्स, चिन ,जपान अशा 36 देशामधुन 3000पेक्षा जास्त स्वयंसेवक.

शिवशक्ति संगम‬ - Profile Badge

प. महाराष्ट्र प्रांतातील हजारो ‪#‎संघ‬ स्वयंसेवकांचे‬ एकत्रीकरण. ३ जाने २०१६ रोजी पुणे येथे!
आपला प्रोफाईल शिवशक्तीसंगम लोगो (Badge) फोटो ठेवण्यासाठी खालील दिल्लेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.picbadges.com/Community/5668233d844a9d8935fee5ac

आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या 'शिवशक्ती संगम' या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती आहेच.
या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये दाखविणारा आणि आपल्याला निमंत्रण देणारा हा १ मिनिटाचा व्हिडीयो .......
चुकवू नये असा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आपण हिंजवडीत आल्यावर कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठीचे दिशादर्शक आपल्याला मार्ग दखवतील.
भेटूया तर मग ३ जानेवारीला दुपारी ३ वाजता.



शिवशक्ति संगम‬ - हिंदु बांधवांसाठी शिदोरी

#‎ShivShaktiSangam‬


 
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
आपल्या घरी दुरून आलेल्या पाहुण्यांच्या हातात , ते त्यांच्या घरी परत जाताना, आपण एक छोटीशी शिदोरी देऊ शकतो का, त्यांच्या रात्रीच्या परतीच्या प्रवासातल्या जेवणासाठी ?
३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेला "शिवशक्ती संगम" हा अतिभव्य कार्यक्रम होतो आहे, हे आपण जाणताच.
या हिंदु समाजाच्याअतिविशाल सांघीकासाठी आपल्या पुण्यात, किमान एक तास आणि कमाल ८ तास, प्रवास करून सातारा, कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे जिल्हा , नाशिक आणि नगर येथून तब्बल ८०,००० हुन अतिथी स्वयंसेवक येणार आहेत.
आणि संध्याकाळी कार्यक्रम संपल्या संपल्या हे सर्वजण आयुष्याची शिदोरी ठरेल असा एक विलक्षण अनुभव गाठीशी बांधून आपापल्या गावासाठी निघणार आहेत.
या साऱ्यांचा परतीचा पल्ला लांबचा आहे,
किमान एक तास आणि कमाल ८ तासांचा प्रवास...
या सर्व स्वयंसेवकांची रात्रीची जेवण्याची सोय आपल्याला पुण्यातून करावयाची आहे.
आणि यासाठी खूप सुटसुटीत बेत आपण सर्व विचारांती ठरवलेला आहे.
पुण्यातून निघताना आपण या स्वयंसेवकांच्या हाती एक 'शिदोरी' देणार आहोत.
या शिदोरी'मध्ये असणार आहेत **"दहा तिखटा-मिठाच्या पुऱ्या, पुरेशी शेगदाण्याची कोरडी चटणी आणि तिळाच्या दोन वड्या"** आणि आपणा सर्वांचे मन:पूर्वक प्रेम.
एका घराने किमान एक शिदोरी द्यावी अशी आपली अपेक्षा आहे.
करू शकतो का आपण इतके आपल्या हिंदु बांधवांसाठी ?
चला तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
देऊ शकू ना आपण ही प्रेमाची शिदोरी आपल्या बंधू-भगिनींच्या हातात ?
शिवशक्ति संगम साठीची शिदोरी पाककृती
पदार्थ :- तिखट मिठाच्या पुऱ्या
साहित्य -
१) चार वाट्या गहु कणीक
२) अर्धी वाटी ज्वारी पीठ
३) अर्धी वाटी डाळीचे (हरबरा) पीठ
४) हिरव्या मिरच्या 5-6
५) लसुन पाकळ्या 7-8 वाटलेल्या
६) चहा चमचा जीरे
७) ४ चमचे कड़कडीत तेल मोहन
८) पाँव चमचा हळद
९) चवीपुरते मीठ
१०) तळण्यापुरते तेल
कृती -
१) ४ वाट्या कणीक चाळून घ्या त्यात अर्धी वाटी ज्वारी व अर्धी वाटी डाळीचे पीठ घालावे. मीठ वाटलेल्या मिरच्या, लसुन, जीरे व हळद घालावी. ४ चमचे कड़कडित तेलाचे मोहन घालून कणीक 30 मिनीटे भिजवावी.
२) त्यानंतर लाट्या कराव्यात अंदाजे ५० होतील, पुऱ्या लाटुन तळून घ्याव्यात.
टीप :
१) तळून कागदावर पुऱ्या काढल्यास कमी तेलकट राहतील
२) अगदी गव्हाचे पीठ + तिखट + मीठ +तेल पुऱ्या होवू शकतात
३) या पुऱ्या तीन ते चार दिवस टिकतात
-----------------------------------------
पदार्थ :- लसुन चटणी
साहित्य:-
१) एक वाटी सुके खोबरे किस
२) १० -१२ लसुन पाकळ्या
३) ४ चमचे तिखट
४) मीठ
५) चिमुटभर साखर
६) २ चिंच बोटुके
७) १ चमचा जीरे
कृती :-
खोबरे किसुन गुलाबी रंग होईतो हलके भाजुन घ्या व् त्यात
लसुन, लाल तिखट, मीठ,साखर,चिंच,जीरे खलबत्यात कुंटूण बारीक करून घ्यावेत मिश्रण एकजीव करावे फार बारीक कुटु नये


टिप:-
१) मीठ +नारळ किस + लाल तिखट +लसुन =चटनी
२) लसनीला ओलसरपणा येण्यासाठी लसुन मिर्ची वाटताना अर्ध्या कांद्याच्या फोड़ी घालाव्यात
सौजन्य:- हमखास पाकसिद्धी -सौ. जयश्री देशपांडे यांच्या पुस्तकातून

ShivShaktiSangam‬ - Special Blog

#‎ShivShaktiSangam‬

लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला मी त्याला नेहमी विचारायचे ‘इतक्या बैठका घेऊन काय करता नक्की? एवढासा छोटासा तर कार्यक्रम ! ठीक आहे ... आज काय दसरासंचलन, दिवाळी वर्ग, उद्या हिवाळी वर्ग मग संक्रांत, वार्षिक उत्सव, पाडवा, उन्हाळी वर्ग मग गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन ... पण मग पुढे काय? असं फक्त एकत्र येऊन काय करता?’ त्यानं कधी एकाजागी बसून मला ह्याची रेडीमेड उत्तरं दिली नाहीत. तो जमेल तसा संघाशी निगडीत राहिला आणि मलाही हळूहळू वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, भारतीय किसान संघ, मजदूर संघ, समिती, मुस्लीम राष्ट्रीय मंच ह्याबद्दल ओघाने समजत गेलं, कुठे कुठे वाचनात येत राहिलं.
मागच्या दहा वर्षात कितीतरी कार्यकर्ते, प्रचारक ह्यांच्या ओळखी होत गेल्या. हे लोक कसं आणि का काम करतात ह्याबाबत उत्सुकताही वाढत गेली आणि काही प्रश्नांची उत्तरंही कोणी न देता एक सामान्य नागरिक म्हणून समजत गेली. तरी कधी कधी ‘ह्या सगळ्याचं पुढे काय ?’ हा प्रश्न असायचाच.
मागच्या दहा वर्षात आपले बदललेले सण समारंभ, खासकरून जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि शिवजयंती, त्यावरून राजकारण, कर्णकर्कश्श संगीत आणि अनावश्यक झगमगाट ह्या गोष्टींमुळे सार्वजनिक उत्सवांचा उबग यायला लागलाय. पण मग विविधतेतून एकता साधण्यासाठी टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवांची आवश्यकताही तेवढीच वाटते. पण मग त्यावर उपाय काय? हे विचारचक्र चालूच राहतं आणि संघाचे कार्यक्रम बघितले कि त्याची उत्तरं मिळत राहतात.
हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे ३ जानेवारी २०१६ ला होणारा एक लाख स्वयंसेवकांच्या एकत्रिकरणाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम. गेले कितीतरी दिवस मी कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहाने संकल्पना राबवताना बघत आहे. संघाची शिस्तबद्धता हा कार्यक्रम राबवताना दिसत आहे आणि आपसूकच शिवशक्ती संगम का, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. कार्यकर्ते जोपासणे, जोडणे, समाजापर्यंत संघ पोहोचवणे ही त्यांची खास अशी उद्दिष्टे असतीलही, पण मला तरी सार्वजनिक उत्सवांमधून अपेक्षित असलेली एकता आणि संघभावनेने काम करण्याचे उत्तम उदाहरण म्हणून ह्या सोहळ्याचं विशेष कौतुक वाटत आहे.
मला व्यक्तिशः दहा लोकांना एकत्र करायचं ही गोष्टही अवघड वाटते आणि आज रोजी एक लाख एकसष्ठ हजारच्या वर स्वयंसेवकांनी कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. सुमारे लाखभर स्वयंसेवक आणि पन्नास हजार नागरिक उपस्थित असतील असा आधीच अंदाज होता. तेव्हापासून खूप उत्सुकता होती. जागा कुठली? सामान्य नागरिक कुठे बसणार? स्टेज किती मोठं? वेगवेगळ्या जिल्ह्या तालुक्यातून लोक येणार त्यांची व्यवस्था काय? जेवण पाण्याचं काय? आसन व्यवस्था कशी? (वर्गात २५ मुलांना रांगेत बसवायचं म्हटलं तर घसा दुखून जातो!) मग आखणी कशी करतात? किती जणांचा एक गट असतो? अनीकिनी प्रानीकिनी म्हणजे काय? प्रेक्षकांना सगळं दिसणार कसं? किती आणि कोण कोण येऊन गेले ह्याची नोंद कशी ठेवणार? सिद्धता केंद्र म्हणजे काय? पत्रकार कुठे असणार? शिदोरी कशासाठी? स्वच्छता कशी राखणार? ‘पर्यावरणपूरक’ म्हणता आहात, म्हणजे काय करणार? किती कॅमेरे असणार? ड्रोन कॅमेराने फोटो आणि शुटींग कसं करतात? सुरक्षेचं काय? वाहतूक कशी कंट्रोल करणार? काही आपत्ती आल्यास त्याचे काय?
हे झाले माझ्यासारख्या सामान्य माणसाचे प्रश्न! एवढा मोठा कार्यक्रम आपल्यासाठी तर अभूतपूर्वच! ह्याच उत्सुकतेपोटी मध्यंतरी कार्यक्रम स्थळी म्हणजे मारुन्जीला जाऊन आले. रस्त्याची, लेवलिंगची कामं बघितली. स्टेज, सिद्धता केंद्र होत होती, आखणी चालू होती. वाहनतळाची व्यवस्था कळली. नुसतं तीन मजली लिफ्ट असलेलं स्टेज बघितलं तरी भव्यतेची कल्पना येईल. आणि माझ्या सामान्य प्रश्नांव्यतिरिक्त कितीतरी गोष्टींचा सखोल विचार करून हा कार्यक्रम आखला आहे हे लक्षात येईल.
शांततापूर्ण मार्गाने नियोजन, व्यवस्थापन आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार, कामाची विभागणी, कार्यकर्त्यांची उतरंड, स्नेहपूर्ण वातावरणात होणारा कार्यक्रम, त्यायोगे साधली जाणारी 'आपण एक आहोत, संघटीत आहोत' ही भावना, वैयक्तिक आयुष्यात होत राहणारे मूल्यवर्धन आणि पर्यायाने घडत जाणारे तरुण आदर्श नागरिक आणि प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना... ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संघाव्यतिरिक्त आणि कोणत्याही व्यक्तिमत्व शिबिराशिवाय फ्री ऑफ कॉस्ट मिळणं अवघडच.
तीन तारखेला कार्यक्रमाला तर तुम्ही यालच. पण ख्रिस्मसच्या सुट्टीत कार्यक्रमाच्या आधी कार्यकर्त्यांचा उत्साह, समरसता, नियोजन आणि व्यवस्थापन बघण्याकरिता, आपल्या मुलांना स्वप्नातीत गोष्टींकरता उद्युक्त करण्याकरिता, मी गेले होते तसंच तुम्हीही आधी नक्की जाऊन या. ख्रिस्तमसचे दिवस असल्यामुळे रस्त्याने जागोजागी लाल टोप्या तर दिसत आहेतच. तसंच आपल्या मुलांना काळ्या टोपीचं कामही बघूद्या, आपणही बघूया.

- अॅड. सौ. विभावरी बिडवे

ShivshaktiSangam - सर्व नागरिक बंधू-भगिनींना हार्दिक निमंत्रण!

!! शिवशक्ती वार्ता !!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाशी आपण परिचित आहात. गेली ९० वर्षे संघ हिंदू समजाच्या संघटनेचे कार्य करीत आहे. संघाच्या प्रेरणेने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ स्वयंसेवकांनी रचनात्मक कामे हाती घेतली आहेत. समाजातील सज्जनशक्ती एकत्र आली व तिचे विराट दर्शन घडले तर आपला धर्म, आपला समाज व आपल्या संस्कृती पुढील सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास गेल्या ९० वर्षात संघाने निर्माण केला आहे. अशा सज्जनशक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांचे सांघिक “शिव शक्ति संगम” रविवार ३ जानेवारी २०१६ रोजी मारुंजी (हिंजवडी जवळ, पुणे) येथे संपन्न होणार आहे. ज्यास संघाचे पू. सरसंघचालक श्री. मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत.
 आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'शिवशक्ती संगम' हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व नागरिक बंधू-भगिनींना हार्दिक निमंत्रण!
हा कार्यक्रम सर्वांसाठी आहे. कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या पासची गरज नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणांहून कार्यक्रम स्थानी येण्यासाठी नाममात्र प्रवासखर्चात बसेसची सोय केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक संघ कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
पर्यावरण आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा अशी विनंती. स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांसाठी सुद्धा वाहनतळ व्यवस्था आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
सत्यजित पांडे
9168625102
9168625127
02024458080
#ShivShaktiSangam